in

‘खाकीतली माणुसकी’; वर्दीतल्या देवदूतांमुळे वाचले तरुणाचे प्राण

खाकी वर्दीतला पोलीस जेवढा कायद्याने वागतो, तेवढाच समाजात बदनाम असल्याचे अनेक किस्से आपण नेहमीच ऐकले आहेत. मात्र याच खाकी वर्दीतल्या देवदूतांमुळे एका अपघातग्रस्त तरुणाचे प्राण वाचविल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यात कर्तव्य बजावत असतानाच त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाचा जीव वाचविण्यासाठी धाव घेतला. यामुळे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना ठाणे पोलीस आयुक्त कार्यलयातून ‘खाकीतील माणुसकी’ असे ट्विटर द्वारे संदेश पाठवून त्यांचे कौतुक केले आहे. राजेंद्र धुमाळ व पंडित राठोड असे खाकीतील माणुसकी दाखविणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे असून दोघेही कोनगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 

अपघातग्रस्त तरुणाचे नाव अक्षय गांगुर्डे (वय १९ वर्ष ) असून तो मुबंई विक्रोळीतील सूर्या नगर परिसरात राहणार आहे. विक्रोळीतून दुचाकीवरून भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक मार्गावरील संग्रीला रिसोडवर पिकनिकसाठी निघाला होता. दुचाकीवरून मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळ गावच्या पुलावर अचानक फिट येऊन रस्त्याचं पडला होता. त्याच सुमाराला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या ताफ्यात दुचाकीवर तैनात असलेले धुमाळ व राठोड या पोलीस कर्मचाऱ्यांनी क्षणाची वाट न पाहता जखमी अवस्थेत पडलेल्या अक्षयला एका कारमधून रुग्णालयात उपचारासाठी वेळेतच दाखल केल्याने त्याचा जीव वाचला. विशेष म्हणजे महामार्गावरील एकाद्या भरधाव वाहनानेही त्याला चिरडलं असते, जर वेळेतच या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली नसती तर, त्यामुळेच ठाणे पोलीस आयुक्त कार्यलयातून ‘खाकीतील माणुसकी’ असे ट्विटर द्वारे संदेश पाठवून त्यांचे कौतुक केले आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात सहा तासानंतर बिबट्याला केलं जेरबंद

बेशिस्त पार्किंग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई