in

HSC Exams | राज्यातील १२वीच्या परीक्षा रद्द… शिक्षणमंत्र्यांचे संकेत

राज्यातील १२वीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सकारात्मकता दाखवली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये १२वीच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चोवीस तासांत गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सरकारने १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्याप अन्य राज्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. महाराष्ट्रात देखील दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर १२वीच्या परीक्षांचा घोळ कायम होता. मात्र आता परीक्षा रद्द करण्याबाबत शालेय शिक्षण मंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. यासंदर्भात त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला अहवाल पाठवल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी…आता दरवर्षी होणार भारत-पाकिस्तान सामने

Gold rate | पाहा सोन्याचे आजचे भाव