in

Solar Eclipse June 2020: शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण; असे पाहता येणार?

Share

येत्या येणाऱ्या रविवारी 21 जून रोजी भारताच्या काही भागत कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येणार आहे.त्यामुळे हे ग्रहण नेमके कोणत्या वेळी दिसणार आणि त्यावेळी आपण नेमकी काय काळजी घेणे आवश्यक आहे हे जाणून घेऊयात.

सूर्य ग्रहण ही एक खगोलीय घटना असून अमावस्येच्या दिवशी दिसते, जेव्हा चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत येतात तेव्हा ही घटना दिसून येते.

भारतीय प्रमाण वेळेनुसार 21 जून रोजी सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल. या ग्रहण काळात गरोदर महिला, नवजात बालकं आणि नवमातांची विशेष काळजी घ्या.

मुंबईत या वेळेत दिसणार सूर्यग्रहण?

मुंबईत सूर्यग्रहण प्रक्रिया सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. 10 ते दुपारी 1  वाजून 27 मिनिटांपर्यंत ही परिस्थिती कायम असेल. सुमारे 3  तास 27 मिनिटांच्या कालावधीत 11 वाजून 37 मिनिटांनी ग्रहण अधिक स्पष्टपणे दिसून येईल.

काय काळजी घ्याल?

  • गॉगल लावणे चुकूनही विसरू नका.
  • टेलिस्कोप सोलार फिल्टर्स लावावेत ज्यामुळे सूर्यकिरणे थेट आता येत नाहीत.

ग्रहणाच्या काळात गरोदर महिलांनी घरीच रहावं.लहान मुलांना सोबत घेणार असाल तर त्यांच्यासाठी विशेष गॉगल घ्यावेत. तुमचे नेहमीचे गॉगल्स, सनग्लासेस वापरुन सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करु नका.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Laal Singh Chaddha: करिना कपूर खान आणि आमिर खान लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’च्या शूटिंगसाठी होणार रुजू?

Video;काय….असावा सुंदर स्टीलचा बंगला…वाचा ‘या’ जिल्ह्यात उभारलाय