in

राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं ! – विनायक राऊत

नाणार प्रकल्पासंदर्भात पुनर्विचार करावा, असे पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत आक्रमक झाल्याचे दिसून येते. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मग आताच त्यांचं मतपरिवर्तन का झालं, असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांनी जमिनी घेतल्या आहेत. त्यांच्या फायद्यासाठी राज ठाकरे ही मागणी करत आहेत. जर त्यांना नानारला समर्थन करायचे असेल तर त्यांनी नानार येथे जावं आणि लोकांचे मत जाणून घ्यावीत.
यावेळी असे आव्हान देखील विनायक राऊत यांनी दिले.

तसेच नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीतही नाणारवासियांनी रिफायनरी प्रकल्पाच्याविरोधात कौल दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीत रिफायनरी समर्थकांना अवघी दोन ते तीन मते पडली. त्यामुळे या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा स्पष्ट विरोध आहे, हे दिसत असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“मी कोब्रा… एक दंश झाला तरी फोटो बनाल,” – मिथुन चक्रवर्ती

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल