in

VIDEO VIRAL ; सुशांत न दिसल्याने कशी झालीये त्याच्या डॉगीची अवस्था

How did the condition of his doggie happen without seeing Sushant
How did the condition of his doggie happen without seeing Sushant
Share

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने त्याचं कुटुंबं, त्याच्या जवळच्या व्यक्ती आणि चाहत्यांना मोठा धक्का दिला. अशीच अवस्था झाली ही ती सुशांतचा कुत्रा फज (Dog Fudge) याची. काही दिवसांपूर्वीच सुशांतच्या भाचीने फजचा व्हिडीओ शेअर केला होता आणि आता त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये डॉगी फज सुशांतच्या बाईकजवळ उभा राहून त्याची वाट पाहत असल्याचा दावा केला जातो आहे.

सुशांत आपल्या डॉगी फजच्या खूप जवळ होता. सुशांतच्या मृत्यूनंतर फजसह त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. आता असाच एक इमोशनल व्हिडीओ व्हायरल होतो. आहे. यामध्ये फज एका बाईकच्या भोवती फिरताना दिसतो आहे. ही बाईक सुशांतची असल्याचं सांगितलं जातं आहे. याच बाईकजवळ उभा राहू फज आपल्या मालकाची म्हणजे सुशांतची वाट पाहत आहे.

काही दिवसांपूर्वी सुशांतची भाजी मल्लिका सिंहने फजचा एक व्हिडीओ शेअर केला होता. जो इन्स्टाग्रामवर व्हारल होत होता. फज आजही सुशांतची करतो आहे. दरवाज्यावर आवाज येताच त्याचं लक्ष तिकडे जातं, मोठ्या आशेने तो दरवाजाकडे पाहतो, असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

या व्हिडीओसह सुशांतने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सुशांत फजसह खेळताना दिसतो आहे. सुशांतने हा व्हिडीओ 2018 साली आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Government's new decision on Corona test

सरकारचा Corona test बाबत नवा निर्णय !

Emotional immersion of Bappa

राज्यात दीड दिवसांच्या बाप्पांचे भावपूर्ण विसर्जन