in

‘BollywoodKiHomeDelivery’ म्हणत अक्षय कुमार, आलिया भट्ट, अजय देवगणसह अनेक मोठ्या बॉलिवूड सिनेमांबाबत हॉटस्टारचा मोठा खुलासा

Share

कोरोनामुळे लॉकडाऊन घोषीत झाल्यापासून तब्बल साडे तीन महिने उलटून गेले आहे आणि अनेक गोष्टी थोड्या शिथिल झाल्या असल्या तरी सिनेमागृह मात्र अजूनही बंदच आहेत. आता बऱ्याच शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे शूटिंग तर सुरू होताना दिसतील पण तरीही अद्याप सिनेमागृह मात्र सुरू होणार नाही आहेत. त्याबद्दलचा अंतिम निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही म्हणूनच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे रिलीज करण्याची वाट अनेक मोठे बॉलिवूड निर्माते धरताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांचा गुलाबो सितोबा हा ए लिस्ट सिनेमा डिजिटली रिलीज केला गेला. त्यानंतर आता अनेक सिनेमे हिच वाट धरतील अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली.

या सगळ्यातंच आता हॉस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मची एक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसली. 29 जून रोजी दुपारी 4.30 वा. हॉटस्टार एक मोठा खुलासा लाईव्ह द्वारे करणार असल्याचं या पोस्टमध्ये जाहीर केलं गेलं आहे. तसंच या पोस्टमध्ये आलिया भट्ट, अक्षय कुमार, अजय देवगण, अभिषेक बच्चन आदी बॉलिवूडचे मोठो चेहरे देखील दिसतात. त्यामुळे ही घोषणा या सगळ्यांच्या सिनेमांच्या डिजिटल रिलीजबद्दल असेल अशी आता चर्चा आहे. सध्या ‘BollywoodKiHomeDelivery’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेन्ड सुद्धा होत आहे.

सूत्रांच्या माहिनीनुसार अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब, तर अजय देवगणचा भूज या शिवाय अनेक मोठे सिनेमे हॉटस्टारने विकत घेतले असून ते या प्लॅटफॉर्मवर लवकरच रिलीज होणार आहेत. तसंच या सिनेमांसाठी एकूण 700 कोटिंची डील साईन झाल्याचं सुद्धा समजतय. आज होणाऱ्या या लाईव्ह सेशनमध्ये अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता तर वर्तवली जात आहेच शिवाय या लाईव्हमध्ये अक्षय कुमार, आलिया भट्ट, अजय देवगण, वरूण धवन आदी बॉलिवूडकरांचा सहभाग असेल असं बोललं जात आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

विठुराया दिसला मला पीपीई किट घातलेला…अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची वारीवर भावनिक कविता

Ashadhi Ekadashi 2020: आषाढी एकादशी निमित्त जाणून घेऊयात व्रत, शुभ मुहूर्त ?