in

सचिन वाझेंना क्राईम ब्रांचमधून काढणार, गृहमंत्री यांची घोषणा; अटकेच्या मागणीवर विरोधक ठाम

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहे. अधिवेशनात विरोधकांकडून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरुन विधानसभेत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार गदारोळ सुरु असून बुधवारी विधानपरिषदेतही मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी सचिन वाझे यांना क्राईम ब्रांचमधून काढून दुसऱ्या ठीकाणी दिलं जाईल अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली आहे. मात्र या घोषणेनंतर विरोधकांकडून सचिन वाझे यांना अटक झालीच पाहिजे अशी घोषणा करण्यात येत होती. या गदारोळनंतर सभा १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.

अनिल देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. मात्र यावरुन विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे अशी विचारणा करत त्यावर बोलण्याची मागणी केली. अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”. निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारावई करण्यात येईल असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसंतदादा साखर कारखान्यात जीएसटी घोटाळा

‘या’ दिवशी बँका राहणार बंद, आतच करून घ्या बँकेची काम