in

दिंडोशी उत्सव प्रकरण: गृहमंत्रालयाच्या आदेशाची पायमल्ली

लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून सार्वजनिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आले आहेत. लग्नसमारंभ, सभा, रॅली, सार्वजनिक कार्यक्रम यांमध्ये गर्दी करण्यावर देखील नियंत्रण ठेवण्याचे आदेश सरकारने दिले. नागरिकांची गर्दी होईल, असे कार्यक्रम रद्द करावे, असा असे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. मात्र, गोरेगावच्या खडकपाड्यात सरकारी नियमांची पायमल्ली करत दिंडोशी उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.येत्या १६ फेब्रुवारीपासून दहा दिवस हा महोत्सव असणार आहे.

सध्या लोकल सेवा सुरू झाल्यापासून मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यातच दिंडोशीसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
गर्दी होईल, असे कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना गृहमंत्रालयाने दिल्या आहेत.

अशात दिंडोशी उत्सवाचे आयोजक मात्र निर्णयावर ठाम आहेत. शिवजयंतीच्या कार्यक्रमांवर सरकारने बंधने घातली आहेत. मात्र दिंडोशी महोत्सवाला कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही या ठिकाणी आकाशपाळणे, अन्य स्टॉलसाठी जागांचे वाटप झाले आहे. मनपाच्या आवश्यक परवान्यांची पूर्तता देखील अद्याप झाली नसल्याने स्थानिकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राजगडावरुन पडून 19 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्र कोरोना अपडेट : आकडा चिंता वाढवणारा