in

महाविकास आघाडीचा दणका; सेलिब्रेटींच्या टि्वट्सची होणार चौकशी

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकरी आंदोलनावरून अनेक सेलिब्रेटींनी केलेल्या टि्वटसची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. शेतकरी आंदोलनप्रकरणी अनेक सेलिब्रेटींनी टि्वट्स केले आहेत. यात त्यांनी देशाच्या अंतर्गत मुद्यावर परकीय हस्तक्षेप करू शकत नाहीत, असं म्हटलं होतं.

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली, अक्षय कुमार, अजय देवगण. सुनील शेट्टी, अजिंक्य राहणे यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी टि्वट करून देश एकसंघ ठेवण्याची मागणी केली होती. यातील बऱ्याच जणांच्या टि्वटमधील मजकुर सारखाच आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगितलं.

पॉपस्टार रियाना, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांसारख्या सेलिब्रेटींनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टि्वट्स केले होते. यानंतर भारतातील अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी टि्वट करून केंद्र सरकारची बाजू घेतली होती. यापैकी अनेकांच्या टि्वटमधील मजकुर हा सारखाच असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यामुळे आता याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Farmers Protest | ‘बुद्धीजीवी’ ऐकल होत, पण काही लोकं ‘आंदोलनजीवी’ झाले – पंतप्रधान

Mumbai Local | मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी!