मुंबईत पुन्हा एकदा कोरोना डोक वर काढताना दिसतो आहे. दररोज नविन कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे येत्या रविवारी व सोमवारी येणाऱ्या होळी, धुलिवंदन सण साजरा करण्यास मुंबईत मनाई करण्यात आली आहे. त्यासंदर्भातलं परिपत्रक पालिकेकडून जारी करण्यात आलं आहे.
मुंबईत आज 3 हजार 512 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच 1 हजार 203 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे दररोजची वाढती रुग्णसंख्या प्रशासनासाठी चिंतेची बाब ठरते आहे. म्हणूनच मुंबई महानगरपालिकेने काही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.त्यानुसार येत्या रविवारी असणारा होळीचा उत्सव, तसेच त्यानंतर असणारा धुलिवंदन हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक अशा कोणत्याच ठिकाणी साजरा करण्यास मनाई केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिपत्रकात नमूद करण्यात आली आहे. तसेच, नियम मोडणाऱ्यांवर साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ आणि भादंवि १८६० नुसार कारवाई केली जाईल, असं देखील या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
Comments
Loading…