in

Thane Sex Racket | ठाण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश… हाय प्रोफाईल अभिनेत्रींचा समावेश

ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील एका घरात चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने बुधवारी दुपारी छापेमारी केली. या कारवाईत दोन अभिनेत्री, दोन महिला एजंट आणि एक पुरुष दलाल अशा पाच जणांना अटक केली आहे. लॉकडाऊनमुळे चित्रीकरण बंद असल्याने आर्थिक चणचण दूर करण्यासाठी आणि आपल्या हायफाय गरजा भागवण्यासाठी सिरीयल आणि सिनेमामध्ये अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या कलाकारांना वेश्या व्यवसायाची नामुष्की पत्करावी लागल्याचे चित्र या घटनेने समोर आले आहे.

मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या. याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. वेश्या व्यवसायासाठी या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या. दलालाच्या आणि ग्राहकाच्या माध्यमातून २ लाखाच्या मागणीवरून १ लाख ८० हजारात सौदा नक्की झाला. ग्राहकाच्या वेळेनुसार दोन्ही अभिनेत्री या ठाण्याच्या पाचपाखाडी नटराज सोसायटीतील सदनिकेत आल्या होत्या.

याबाबतची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकणे यांनी सापळा रचून माहितीची खातरजमा करत छापेमारी केली. घटनास्थळी एक महिला घरमालक, दोन अभिनेत्री, एक महिला एजंट आणि एक पुरुष दलाल अशा पाचजणांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Oxygen tank leak; मिरजेत शासकीय कोविड रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती

अखेर परदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा; DCGI कडून हिरवा कंदील