in

पंतप्रधानांच्या उपस्थितीत कोरोना स्थितीवर उच्चस्तरीय बैठक

देशात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या देशातील स्थितीवर उच्चस्तरीय बैठक घेतली. दरम्यान देशात करोना रुग्णांची २४ तासातील संख्या ३४९७३ झाली असून २६० जणांचा बळी गेला आहे.

देशातील निम्म्या लोकांना पहिली मात्रा दिली असून एकूण १८ टक्के लोकांना दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत ७२ कोटी लस मात्रा देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे लागोपाठ दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील गणेशोत्सवावर विरजण पडले.

मुंबई शहर पोलिस आयुक्तांनी जमावबंदी आदेश १० ते१९ सप्टेंबर या काळात लागू केला आहे. लोकांनी गणपतीचे आभासी दर्शन घ्यावे असे सुचवण्यात आले आहे. दरम्यान करोनाबाबत एका पत्रकार परिषदेत निती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही.के.पॉल यांनी सांगितले, की शाळा उघडण्यासाठी मुलांच्या लसीकरणाची पूर्वअट नाही. हा निकष जगात कुठेही लागू करण्यात आलेला नाही. पण शिक्षक व कर्मचाऱ्यांचे लसीकरण गरजेचे आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बदलापूर

अमरावतीत अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार; बदनामीच्या भीतीनं मुलीने संपवलं जीवन