in ,

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची बहीण मितूसिंह विरुद्धचा एफआयआर हायकोर्टाकडून रद्द

लोकशाही न्यूज नेटवर्क

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची बहीण मितूसिंह हिच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. तथापि, त्याची दुसरी बहीण प्रियांका हिच्याविरुद्धचा एफआयआर कायम ठेवण्यात आला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा एफआयआर नोंदवण्यात आला होता.

सुशांतसिंह राजपूत गेल्या 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता. याच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर जोरदार टीका करण्यात आली होती. अशातच सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीने सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मितू यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. सुशांतला नैराश्यवरील औषधे देण्यासाठी डॉक्टरकडून बनावट प्रिस्क्रिप्शन मिळवल्याचा दावा तिने केला होता. त्यानुसार पोलिसांनी सुशांतच्या बहिणी आणि एका डॉक्टरविरोधात एफआयआर दाखल केला होता. प्रियांका आणि मितू यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून हा एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने मितूविरुद्धचा एफआयआर रद्दबातल केला आहे. मात्र प्रियांकाविरुद्धचा एफआयआर कायम आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल-डिझेलपाठोपाठ एलपीजी सिलिंडरचीही दरवाढ

परभणी जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर