in ,

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी हायकोर्टाकडून रद्द

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केलं आहे. २०१३ मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. घटना घडली तेव्हा लोकांचा रोष अधिक होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असं कोर्टाने यावेळी नमूद केलं.

आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर २०१४ ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला होता. दरम्यान आज निर्णय सुनावताना कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्याचा निर्णय दिला.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती.

काय आहे प्रकरण?
मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापची लाट उसळली होती. पोलिसांनी याप्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. कोर्टाने सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

असा होता घटनाक्रम

 • 22 ऑगस्ट 2013 रोजी आपल्या एका सहकाऱ्यासह एक महिला फोटो जर्नलिस्ट शक्ति मिल परिसरात कव्हरेजसाठी गेली होती. 
 • महालक्ष्मी परिसरात सुनसान अशी बंद पडलेली ही मिल. सायंकाळी सहा वाजता महिला पत्रकार आणि तिच्या सहकाऱ्याला काही लोकांनी पोलिस असल्याचं सांगत फोटो काढू नका असं सांगितलं. 
 • त्या लोकांनी म्हटलं की आमच्या परवानगी शिवाय फोटो काढू शकत नाहीत. 
 • नंतर त्यांनी महिला पत्रकार आणि त्याच्या सहकाऱ्याला आतमध्ये नेलं.
 • आत गेल्यावर दोघांवर हल्ला केला आणि महिला पत्रकाराच्या सहकाऱ्याला तिथं बांधून ठेवलं.  
 • त्यानंतर महिला पत्रकारासोबत पाच लोकांनी गॅंगरेप केला. 
 • दोन तासानंतर कसंबसं दोघांनी तिथून आपली सुटका केली आणि हॉस्पीटल गाठलं. 
 • डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. या घटनेने पोलिस देखील हादरुन गेले. 
 • 72 तासात पोलिसांनी सर्व पाच आरोपीनं अटक केली  
 • चौकशी दरम्यान आणखी एक गॅंगरेपचं प्रकरण समोर आलं. यातील तीन आरोपींनी शक्ती मिल परिसरातच आणखी एक गँगरेप केला होता.  
 • आरोपींच्या अटकेनंतर काही दिवसांनी एक कॉल सेंटरमध्ये काम करणारी टेलिफोन ऑपरेटर समोर आली जिनं तिच्यावर तिघांनी रेप केला असल्याचं सांगितलं.  
 • 31 जुलै 2013 रोजी शक्ति मिल परिसरात तिच्यासोबत सामूहिक बलात्कार झाला होता.  
 • पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात आरोपींवर ऑक्टोबर 2013 मध्ये 362 पानांची चार्जशीट फाईल केली. 
 • दोन्ही प्रकरणात पीडितांकडून  सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यानंतर आरोपींना दोषी मानलं गेलं.  
 • अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार ते अशा प्रकारच्या शिकार आपली वासना मिटवण्यासाठी शोधत होते.  
 • आरोपींनी सांगितलं होतं की, ते मदनपुरा, भायखळा आणि आगरीपाडा परिसरात  नियमित पॉर्न फिल्म्स पाहायचे. सोबतच रेड लाईट परिसरातही त्यांचं येणं जाणं असायचं.  
 • आरोपी विजय जाधव, कासिम बंगाली आणि एक अल्पवयीन आरोपीनं चौकशीत सांगितलं होतं की, ते नेहमी पॉर्न फिल्म पाहायचे. 
 • रेप केल्यानंतर त्यांनी पावभाजी खाल्ली  
 • महिला पत्रकारासोबत रेप करणारा अल्पवयीन आरोपी ज्यावेळी घरी आला त्यावेळी त्याला कुठलाही पश्चाताप नव्हता.  तो चिकनच्या दुकानावर कामाला होता.   
 • दोन्ही गॅंगरेप प्रकरणी एप्रिल 2014 मध्ये  सेशन कोर्टात निर्णय सुनावला.
 • विजय जाधव (19 वर्ष), मोहम्मद कासिम शेख (21 वर्ष) आणि मोहम्मद अंसारी (28 वर्ष) दोन्ही प्रकरणात दोषी सिद्ध झाले. या तिघांना दोन वेळा गँगरेप केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 
 • अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली तर सिराज खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसबद्दल काही खास गोष्टी…

इंग्लिश खाडीत बोट बुडाली; अपघातात 31 निर्वासित ठार