in

नालासोपारात नंग्या तलवारी घेऊन गावगुंडांचा हैदोस

Share

वसई विरार | कोरोनाच्या महामारीने एकीकडे मुंबईचा क्राईम रेट कमी झालेला असताना, दुसरीकडे मात्र नालासोपाऱ्यात तलवारीचा नंगा नाच पाहायला मिळाला. स्थानिक गावगुंडानी नंग्या तलवारी घेऊन हैदोस घालण्याचा हा प्रकार केला आहे. या संदर्भातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( कोरोना रुग्णांची तपासणी न करताच दिला जातोय डिस्चार्ज )

घटनाक्रम असा आहे कि, नालासोपारा पूर्वच्या प्रगती नगर परिसरातली हि घटना आहे. मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर भररस्त्यात तलवारीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुंडांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. संजय मिश्रा (वय 22) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत 30 जून रोजी 4 गुंडाविरोधात तुलिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर इतर तीन जणांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.डी. पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान सध्या गावगुंडांकडून खुलेआम तलवारीचा नंगानाच सुरु असल्याने कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे उडवले जात आहेत.तसेच हातात तलवार, लाठी-काठी घेऊन गुंडांचा हैदोस सुरु असल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

लॉकडाऊनमध्ये ‘या’ महानगरपालिकेत निघालीय मोठी भरती

Monsoon Updates;मुंबई, ठाणे, पालघरात मुसळधार पावसाची शक्यता