in ,

‘पुढील आढवाड्यात राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता’

गेल्या मागील चार-पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर हळुहळू कमी झाला आहे. पुढील दोन दिवसही राज्यात पावसाची खूपच कमी शक्यता आहे. पण पुढील आढवाड्यात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.रविवारी हवामान खात्यानं नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. दरम्यान याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी उर्वरित राज्यात मात्र कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा किंचितचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांना ७ दिवसांची सुट्टी, ‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय सोमवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहेत.मंगळवारी पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Chardham Yatra | चारधाम यात्रा उद्यापासून सुरू होणार

पाकिस्तानची नाचक्की; सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडच्या संघाची मालिकेतून माघार