in

विदर्भात आठवडाभर मुसळधार पाऊस, पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

विदर्भात 15 जून नंतर पावसाळा सुरू होतो, मात्र यंदा आठवड्याभरा पूर्वीच विदर्भात पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे तर 17 जून पर्यंत आठवडाभर विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून पुढील तीन दिवस अकोला अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज अमरावतीचे हवामान तज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला.

तर आज अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून विदर्भात सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे तर उद्या पासून शेतकरी पेरणी करण्याची शक्यता आहे,विदर्भातील शेतकरी 15 मे नंतर मान्सूनपूर्व पेरणी करत असतो मात्र या वर्षी शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली नाही तर आता पावसाळा सुरू झाला असून अद्यापही शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही मात्र काल पासून सुरू असलेल्या पावसाने शेतकरी आनंदित झाला असून शेतकरीराजा आता दमदार पावसाने सुखावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मॅनहोलमध्ये दोन महिला पडल्या, थोडक्यात बचावल्या

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर निर्णय झाला नाही तर एकदाच…; संभाजीराजे छत्रपती