in

मुसळधार पावसामुळे बेळगावात भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू

बेळगाव (Balgaum) मधील बादल अंकलगी गावात मुसळधार पावसात घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री साधारणत: 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत्यू झालेले सर्वच्या सर्व सातही जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बादल अंकलगी गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत घटनास्थळीच पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकांमध्ये दोन आठ वर्षांच्या मुलींचाही समावेश आहे.

अंबरनाथमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू

बुधवारी सायंकाळच्या सुमारास मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस बरसला. याच दरम्यान अंबरनाथमध्ये एक भिंत कोसळली आणि त्याखाली दोघेजण दबले गेले. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य, समृद्धी घेऊन येवो”; मोदींच्या शुभेच्छा

लखीमपूर प्रकरणातला एक नवा व्हिडीओ ; काय आहे सत्य?