in

Heavy rainfall in delhi | राजधानीत पाणीच पाणी, विमानतळावरील धावपट्टीही पाण्याखाली

संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना देशाची राजधानी वेगळ्याच समस्येला समस्येला सामोरे जात आहे. दिल्लीत शुक्रवारी सायंकाळपासून मुसळधार पावसानं झोडपून (Heavy rainfall in delhi) काढलं आहे. कमी वेळात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे दिल्लीतील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. एवढंच नव्हे तर, मुसळधार पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (IGI Airport) काही भागांत पुरस्थिती निर्माण (Water logging at IGI airport) झाली आहे. परिणामी चार डोमेस्टीक आणि एक आंतरराष्ट्रीय विमानाचा मार्ग बदलण्यात आला आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल क्रमांक 3 वर सर्वाधिक पाणी साचलं आहे.

तसेच विमानतळाच्या धावपट्टीवरील पाणी काढून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांची एक टीम पोहोचली असून धावपट्टीवरील पाणी काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच दिल्लीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 4 राष्ट्रीय आणि 1 आंतरराष्ट्रीय विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहे. संबंधित विमानं जयपूर आणि अहमदाबाद विमानतळाकडे वळवण्यात आल्याची माहितीही विमानतळ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साकीनाका महिला बलात्कार आणि मृत्यु प्रकरण; फास्ट ट्रॅकवर कोर्टात खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

साकीनाका महिला बलात्कार आणि मृत्यु प्रकरण; आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी