in

राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

राज्यात कोरोनाचे संकट असतानाच आता अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री पासून ढगाळ वातवरण आहे. यामुळे द्राक्ष बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कासेगाव,  लक्ष्मी टाकळी,  बोहाळी, उंबरगाव.,खर्डी या गावांचा समावेश असून काढणीला आलेल्या द्राक्ष बागाना फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आज दुपारी आणि उद्या पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

औरंगाबादमध्ये गाराचा पाऊस पडला. सोयगाव शहरासह तालुक्यात सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, तालुक्यातील जरंडी सह परिसरात सकाळी गाराचा पाऊस पडला आहे. नांदेड जिल्ह्यातसुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावलीय. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी हंगामाचे मोठे नुकसान होणार आहे. विशेषतः ज्वारी , गव्हू आणि हरभरा पिकाला या पावसाचा मोठा फटका बसणार आहे.

सांगलीमध्ये वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाट सह जोरदार पाऊस पडत आहे. या परिस्थितीमुळे तापमानात घट झाली आहे.

मराठवाड्यासह कोकणातही पावसाने हजेरी दिली आहे. रत्नागिरीत पावसानं हजेरी लावलीय जिल्ह्यातील बहूतांशी भागात मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे. चिपळूण ,संगमेश्वर ,साखरपा , देवरुख आदी भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिक मात्र अडचणीत आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यपाल आणि सरकारमध्ये सुरूच आहे, ‘पत्रास कारण की…’

काँग्रेसचे जोडे उचलणाऱ्या शिवसेना नेतृत्वाकडे मेंदू आहे का?; अतुल भातखळकर यांची टीका