in , ,

मृत आईला जागवू पाहतोय ‘हा’ चिमुरडा, पाहा VIDEO

Share

मुजफ्फरपुर: भीषण गर्मी आणि भूकेने तडफडून बिहार मुजफ्फरपुर रेल्वे स्टेशनवर एका महिलेचा मृत्यू झालाय. तिचा लहान मुलगा आईवर ठेवलेल्या अंथरुणाला काढण्याचा प्रयत्न करत त्याला बाजूला करत आईला जागवण्याचा प्रयत्न करत आहे. या घटनेची व्हिडीओ सध्या सोशल माडियावर व्हायरल होतोय. कोरोना व्हायरस लॉकडाउनमुळे सर्वात जास्त त्रास प्रवासी मजुरांना होत असून त्यांची दुर्दशा दुर्दैवाने संपण्याचं नाव घेत नाहीये.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये असे हे दिसून येते आहे आहे की, ती महिला रेल्वे प्लॅटफॉर्म निपचित पडली आहे, तिला कपड्याने लपेटले आहे. तिचं मुलं तिच्यावर असलेलं ‘अंथरून’ काढण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु स्पष्टपणे आई त्याचे ऐकत नाहीये असं दिसतंय. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तीव्र उष्णता, भूक आणि निर्जलीकरणामुळे मरण पावली आहे. ही महिला मजूर रेल्वेमार्गे मुजफ्फरपूरला पोहोचली.

एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रेनमध्ये खाण्यापिण्याअभावी महिलेची प्रकृती खालावली असल्याचे महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यांनी शनिवारी गुजरातहून ट्रेन घेतली आणि सोमवारी ट्रेन मुजफ्फरपुरात दाखल झाल्यानंतर थोड्याच वेळात तिचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह स्टेशनच्या प्लॅटफॉर्म पडला होता. यावेळी, तिचा मुलाने तिला जागवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करताना दिसून आले.

यापूर्वी अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला:

याशिवाय मुझफ्फरपूर स्थानकातच अडीच वर्षाच्या मुलाचा देखील मृत्यू झाला होता. मृत मुलाच्या कुटुंबाचे म्हणणे आहे ,की भीषण उष्णतेमुळे आणि ट्रेनमध्ये खाण्यापिण्याच्या अभावामुळे मुलाची प्रकृती खालावली आणि स्टेशनवरच पोहचल्यावर त्याचा मृत्यू झाला. आईला खायला न मिळाल्याने तिच्याकडे दूध नाही, म्हणजे मुलालाही ती दूध देऊ शकली नाही. शेवटी त्या मुलाचे दुधाअभावी मरण झाले आहे.

बेतिया येथील रहिवासी असलेले मृत मुलाचे वडील मकसूद आलम यांनी सांगितले की, ते दिल्ली येथे चित्रकार (पेंटर) म्हणून काम करत होते. रविवारी ते कुटुंब आपल्या परिवारासह श्रमिक ट्रेनने घराकडे निघाले. सोमवारी सकाळी दहा वाजता त्यांची गाडी मुझफ्फरपूरला पोहोचली. कडक उन्हात ट्रेनमध्ये अन्न व पाणी नसल्यामुळे मुलाची तब्येत ढासळली आणि मुझफ्फरपूर स्थानकात उतरताच त्याची प्रकृती बिघडली. 

मकसूद आलमचा आरोप आहे की, त्यांनी पोलिस व स्टेशनवर उपस्थित जिल्हा प्रशासनाच्या अधिका-यांकडे मुलावर उपचार करण्यासाठी विनंती केली परंतु, कोणत्याही व्यक्तीने त्याचे ऐकले नाही. तो स्टेशनवर चार तास मदतीसाठी भटकत होता, तसेच घरी जाण्यासाठी गाडीची माहिती विचारत होता पण कोणीच माहिती द्यायला तयार नाही. आणि शेवटी त्या लहान मुलाने अखेर श्वास घेणं बंद केलं आणि त्याचा तिथेच मृत्यू झाला.

लॉकडाऊनमुळे नोकरी करणारे तसेच हातावर पोट असलेले लाखो कामगार, मजुर घरी पोहचण्यासाठी असंख्य मैल पायी प्रवास करत आहेत. दरम्यान, अनेक कामगार भूक, तहान आणि वाढत्या उकाड्यामुळे मरण पावले आहेत. त्याचबरोबर बर्‍याच घटनांमध्ये त्यांच्या वाहनांचा अपघातही झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत शेकडो कामगारांचा विविध घटनांमध्ये मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

आता व्हॉट्सॲपवरून करता येणार घरगुती गॅसचे बुकिंग

Maine Pyar Kiya: सलमानला भाग्यश्रीला किस करायला सांगितल्यास, ‘हे’ होत सलमानचं उत्तर