in

माझ्याजवळ तो खूप रडायचा, मला माहिती आहे त्याच्या मृत्यू मागचं… – शेखर म्हणतात

He used to cry a lot with me, I know behind his death ... - says Shekhar
He used to cry a lot with me, I know behind his death ... - says Shekhar
Share

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ का आली, यावर अनेकजण प्रश्नचिन्ह उठवताना दिसत आहेत, मात्र त्याच्यासोबत असलेले अनेक बॉलिवूडमधील कलाकारदेखील यावर संशय व्यक्त करताना दिसत आहेत.

अभिनेत्री कंगना रनौतनेदेखील या सगळ्याला बॉलिवूडमधील अनेक दिग्ददर्शक जबाबदार असल्याचे म्हणत आहे, तर अनेक इंडस्ट्रीजने त्याच्यावर बॅन आणल्यामुळे ही परिस्थिती त्याच्यावर ओढवली, असे मत दिग्दर्शक शेखर कपूरने आपल्या सोशल मिडायवर म्हटलं आहे.

सोशल मीडियावर सुशांतने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली अशा पोस्ट व्हायरल होत आहेत, मात्र सुशांतने घेतलेल्या या निर्णयामागचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न अनेक सेलिब्रिटी आणि चाहते करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 6 महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूत माणसिक तणावाच्या गोष्टीवरून उपचार सुरू होते. मात्र सुशांतच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की तो आता डिप्रेशनचे औषध घेत नव्हता. सुशांत आत्महत्या करू शकत नाही, असे सांगत कुटुंबीयांनी पोलीस तपासाची मागणी केली. दरम्यान, सुशांतच्या मृत्यूवर दिग्दर्शक शेखर कपूरने मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की सुशांतबद्दल मला अनेक गोष्टी माहित आहेत, तो माझ्यासमोर खूप रडत असे, त्याच्या अनेक गोष्टी मला माहित आहेत.

शेखर कपूर यांनी ट्विट करून सुशांतबद्दलच्या गोष्टी शेअर केल्या आहेत. शेखर कपूर म्हणतात की सुशांत ज्या वेदना सहन करत होता, त्या मला माहित होत्या. मला त्या लोकांची कहाणी माहित आहे, ज्यांनी तुला (सुशांतला) अशा प्रकारे निराश केले आहे. तू माझ्या खांद्यावर रडायचास, हे मला चांगलच आठवतं. माला आता वाटतं की गेल्या 6 महिन्यांत मी तुझ्याभोवती असायला हवं होतं, हे सगळं करण्याआधी तू माझ्याशी संपर्क साधला असतास, तर हे सगळं झालच नसतं. तुझ्याबरोबर जे घडले, ते तुझ्या नाही, तर त्यांच्या कर्माचे फळ होतं, असंही शेखर म्हणतात.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

त्याच्या आयुष्यातील ती 50 स्वप्न; जी पूर्ण होता होता राहिली…

The state has so far reached 5,79,569 home quarantine, bringing the total number of patients.

आज एकाच दिवशी महाराष्ट्रात मिळाला ५ हजाराहून अधिक लोकांना डिस्चार्ज, तर…