in

‘हा’ जगप्रसिद्ध मिमर आहे नायजेरियाचा अभिनेता!

Share

सोशल मीडियावर आजकाल मिम्सचा ट्रेंड जास्त असतो. असंख्य लोक जास्तीत जास्त मिम्स शेअर करण्यास प्राधान्य देतात. यामध्ये सर्वात जास्त मिम्स ज्या व्यक्तीवर बनवले गेले आहेत ?, ज्याच्यामुळे तुम्हाला हसू अनावर होत नाही. हा व्यक्ती तुमच्या परिचयातला नाहीच आहे, मात्र त्याची प्रत्येक मिम्स तुमच्या चांगल्या परिचयाची आहे. याच व्यक्तीची तुम्हाला आज माहिती सांगणार आहे.

सद्यस्थितीत सोशल मीडियावर सर्वाधिक मिम्स हे ओसीता इमे या व्यक्तीचे व्हायरल होत आहेत. या व्यक्तीच वय ३८ आहे. मात्र त्यांच्या प्रत्येक व्हिडीओ व मिम्समध्ये तो 15 वर्षांच्या मुलासारखा दिसतो. यामागे एक वेगळं कारण आहे. हे कारण सुद्धा शेवटी तुम्हाला सांगितलं जाईल. मात्र हा 15 वर्षांचा दिसणारा मुलगा हा नायजेरियाचा मोठा अभिनेता आहे. विशेष म्हणजे या 38 वर्षांच्या ओसीता इमेने मिम्स जगतात धुमाकूळ घातलाय. त्याच्या प्रत्येक मिम्स भरघोस लाईक कमेट असतात.

फिल्मी करिअर

20 फेब्रुवारी 1982 रोजी ओसीता इमे याचा जन्म झाला होता. त्याने आपले शालेय शिक्षण इमो इस्टेट नायजेरिया या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर एबीया इस्टेट महाविद्यालयामधून कॉम्प्युटर सायन्समद्ये बीएससीची पदवी घेतली. खरतर लहानपणी त्याला फुटबॉलर बनायचं होत मात्र तो अभिनय क्षेत्रामध्ये तो वळला.
2003 मध्ये त्याची अकि ना उकवा हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात ओसीता चिनेडू इकेडाइज या कलाकारा सोबत ‘पावपाव’ ची भूमिका साकारल्यामुळे तो सर्वाधिक ओळखला जातो. या दोन्ही कलाकरांना नॉलीवूडच्या नायजेरियन फिल्मचा कॉमेडी किंग मानलं जात. ओसीता हा नॉलीवूड इंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. जवळपास ५० सिनेमांमद्ये त्याने अभिनय केला आहे. या कलाकाराला असंख्य अवॉर्ड हि मिळाले आहेत. आफ्रिका सिनेमा अकादमीने तर त्याला लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड हि प्रदान केला आहे.

या कारणामुळे झाला होता प्रसिद्ध

ओसीताचा मिम्स व्हायरल होण्याचा कारण ठरली आहे एक महिला. तिचे आहे निकोल, ती ब्राझीलची आहे. निकोल हि ओसीताची मोठी चाहती होती. त्यामुळे ती सतत सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ, फोटो, सोशल मीडियावर शेअर करायची. विशेष म्हणजे तिने व्हिडीओ व फोटो शेअर केले होते ते त्यांच्या 15 व्या वय वर्षांचे आहेत. त्यामुळे आपल्याला तो लहान मुलगा वाटायचं. मात्र आता तो 38 वर्षांचा नायजेरियन फिल्म इंडस्ट्रीतला मोठा अभिनेता आहे. निकोलच्या त्या शेअरिंगमुळेच ओसीता प्रसिद्ध झोतात आला आणि त्याच्यावर मिम्स बनली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Video; शेतकऱ्याच्या आयडियाची कल्पना; बनवले आधुनिक पद्धतीचे यंत्र

चाकरमान्यांची कोंडी करण्याचा सरकारचा प्लॅन-आशिष शेलार