in

गच्चीवर फुलपाखरांची बाग पाहिली आहे का? मग पाहाच..

Share

पुणे : आत्तापर्यंत आपण घराच्या गच्चीवर विविध फुलांची, भाज्यांची, इतर प्रकारच्या बागा उभारलेल्या पहिल्या असतील पण तुम्ही कधी घराच्या गच्चीवर फुलपाखरांची बाग असलेली पाहिलीय का? हो हो हे खरं आहे पुण्यातील एका डॉक्टरांनी चक्क घराच्या गच्चीवरच फुलपाखरांची बाग बनवलीय…

डॉ. संजय दाते पेशाने जनरल

फिजिशियन आहेत, मात्र लहानपणापासून त्यांना निसर्गाची आवड होती, त्यातून त्याना फुलपाखरू बघण्याची आवड निर्माण झाली, कुठेही फिरायला गेल्यावर दाते यांच लक्ष कायम फुलपाखरावर असते, कुठे कुठल्या प्रकारची फुलपाखरे दिसतायत, कुठल्या फुलावरती आहेत, यांच्याकडे त्याच लक्ष जाऊ लागलं… या सगळ्यांचा अभ्यास करत गेल्यावर दाते यांना माहीत झालं की कुठल्या झाडावर कुठली फुलपाखरे अंडी घालतात..

दाते यांनी त्यांच्या गच्चीवर लावलेली झाडे कुठलेही वेगळी नाहीतर जी साधारण झाडे असतात तिचं लावलीय…त्यांची व्यवस्थित काळजी घेतली की तर आपल्या गचीवर नक्कीच फुलपाखरे येतील असा त्यांना विश्वास वाटतो…

गेली पाच ते सात वर्षे ते या बागेत फुलपाखरांच निरीक्षण आणि अभ्यास करत आहेत. सध्या महाराष्ट्रात साडेचारशेच्या आसपास फुलपाखरे सापडतात… तर पुणे शहरात 100 हुन अधिक प्रजातींची फुलपाखरे आढळतात…गेल्या 5 वर्षात दाते यांनी त्यांच्या गच्चीवर 48 प्रजातींची फुलपाखराचं निरीक्षण केलंय…

कढीपत्ता, लिंबू वर्गीय झाडे, सोनचाफा, सोनटक्का या झाडांवर काही फुलपाखरे अंडी घालतात. जास्वंदी, सोनचाफा, शेवंती यासारख्या फुलांच्या मधुरस जास्त प्रमाणात असतो आणि ते फुलपाखरांना आकर्षित करतात… कुठलीही केमिकल्स वापरायचे नाही..कारण त्यांनी फुलपाखरे जवळ येत नाहीत असं ही त्यांचं निरीक्षण आहे…

निसर्ग इतका मोठा आहे त्याच्यामध्ये इतकी व्हरायटी, विविधता आहे. त्याच्या मार्गाने आपण खूप छोट असल्याचं दाते सांगतात. त्यामुळे याच जर संवर्धन आपण नीट केल नाहीतर पुढच्या पिढीला फुलपाखराबद्दल जास्त माहिती होणार नाही, असं ते म्हणतात. त्यामुळे दाते यांच्या फुलपाखराच्या बागेतून प्रत्येकानी ब्रँचच काही शिकण्यासारखं आहे….

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Rain Update | 5 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट

घोडबंदरजवळ दोन वाहने पटलीमुळे ठाण्यात वाहतूक कोंडी