in

हार्दिक पांड्याची होणार फिटनेस टेस्ट

न्यूझीलंडविरुद्ध ‘करो वा मरो’ या सामन्याआधीच भारतीय खेळाडू हार्दिक पंड्याची चर्चा होत आहे. यावर अंतिम निर्णय व्यवस्थापन संघ घेणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी २९ ऑक्टोबरला हार्दिक पांड्याची फिटनेस चाचणी झाली. त्याने ही फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली, तरच त्याची न्यूझीलंड विरुद्ध खेळणाऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होऊ शकते.

दरम्यान इनसाइड स्पोर्टच्या रिपोर्ट वरून, “आज संध्याकाळी हार्दिक पंड्याची फिटनेस चाचणी होणार. या चाचणीत त्याला नेटमध्ये तीन ते चार षटकांचा स्पेल देणार. फिटनेस चाचणीनंतरच व्यवस्थापन संघ हार्दिकच्या न्यूझीलंडविरुद्धच्या संघात खेळणार कि नाही याचा अंतिम निर्णय घेणार आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामना खेळण्यापूर्वी हार्दिक हा नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला आहे. हार्दिकने आपला खेळ कुठे तरी कमी नको पडायला या करीता सरावाकडे जरा जास्त भर दिले आहे. कारण टी20 सामन्यात हार्दिकचा गेम इतका खास नव्हता. पण पांड्याकडे खेळण्याची पूर्ण क्षमता आहे. परंतु सामन्यात तो गोलंदाजी करण्यासाठी किती फिट असेल हे आज होणाऱ्या फिटनेस टेस्टमधून समोर येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत रोहयो अधिकाऱ्याचा मृत्यू; बिडिओवर गंभीर आरोप, ऑडिओ क्लीपने खळबळ

नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; १२ तासात आरोपी गजाआड