उन्हाळा सुरु झाल्यानंतर सर्वांनाच प्रतीक्षा लागून राहिलेली असते ती म्हणजे फळांच्या राजाची, अर्थात हापूस आंब्याची. हा हापूस आंबा आपल्या घरी कधी एकदा येतो आणी आपण तो खातो याची उत्सुकता लागलेली असते. आंब्याच्या दरांमध्ये होणारे चढउतार आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी हापूस आंब्यानं त्याचा दरांचा एक वेगळाच विक्रम रचला आहे.
कोकणातील 10 आंबा बागायतदारांच्या मुहूर्ताच्या आंबा पेटींचा लिलावाचा कार्यक्रम 5 मार्च रोजी अंधेरीतील मॅरिएट येथे सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. शेतकऱ्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढवणारी ‘मायको’ ब्रँडची पहिली पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरच्या राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपये अशी विक्रमी किंमत देऊन घेतली. जवळपास मागील 100 वर्षांमध्ये हापूस आंब्याच्या पेटीला इतकी मिळाली नव्हती.
कोकणातील हापूस आंब्याला जगभरातील बाजारपेठ थेट विक्रीसाठी उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ या देशातील पहिल्याच मँगोटेक प्लॅटफॉर्मद्वारे पुढाकार घेतला आहे. हा आजवरचा सर्वात मोठा विक्रम असून 100 वर्षांमध्ये हापूस आंब्याच्या पेटीला इतकी मिळाली नव्हती.
Comments
Loading…