in ,

आज जागतिक महिला दिन; ‘लोकशाही न्यूज’कडून शुभेच्छा

आज जागतिक महिला दिवस. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील महिलांच्या सन्मानार्थ या दिवसाचं आयोजन केलं जातं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या सन्मानासाठी आजचा दिवस साजरा करतात.

आज सर्वच क्षेत्रात महिलांचा लक्षणीय सहभाग आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत आहेत. जगभरातील महिलांच्या सन्मानार्थ सर्व जण हा दिवस साजरा करतात. आज विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. प्रत्येक स्त्रीप्रती सन्मान आणि आदर दाखवण्याचा हा केवळ एकच दिवस नसावा तर नेहमीच स्त्रियांचा आदर करणं गरजेचं आहे.

लोकशाही न्यूजकडून सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्रीडा क्षेत्रात स्वतःचे अढळस्थान निर्माण करणारी कबड्डीपंच – आरती बारी

गुगलकडून नारीशक्तीचा अनोखा सन्मान