in

Happy Teacher’s Day 2020; विद्यार्थी सोशल मिडियावरून देतायत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…

Share

कोरोना महामारीमुळे यंदा सर्वच शाळांना टाळे आहे.त्यामुळे शिक्षक दिन कसा साजरा होईल असाच प्रश्न शिक्षकांसमोर पडला होता. मात्र या प्रश्नांचे उत्तर आता विद्यार्थ्यांनी ऑनलाईनद्वारे शिक्षकांना दिले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी छान-छान ड्रॉइंग काढून आपल्या शिक्षकांच्या मोबाईलवर ती पाठवून हा दिवस साजरा केला आहे. त्यामुळे शिक्षकशी ही ड्रॉइंगस पाहून भारावले आहेत.

भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 5 सप्टेंबर रोजीच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे शाळा-महाविद्यालये बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरु आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांनी स्वत: घरी चित्र काढून शिक्षकाना पाठवली आहेत. अशाप्रकारे हा शिक्षक दिन साजरा करण्यात आला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

हो ! मी सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करायचो…

Vivo लाँच करणार आपोआप रंग बदलणार स्मार्टफोन