in

अमरावतीत पीक विम्यात फसवणूक केल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची लुट करून विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत. तसेच खरीप २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसाच्या सरकारनी पिक विमा कंपन्या सोबत केलेल्या करारानुसार ८५ लाख शेतकऱ्यांना ५७९५ कोटी रुपयाचा लाभ मिळाला होता,परंतु २०२० खरीप करिता उद्धव ठाकरे सरकारनी विम्याचे निकष बदलविले, उंबरठा उत्पादन कमी केले आणि त्यामुळे महाराष्ट्रात खरीप २०२० मध्ये फक्त ७४३ कोटी रुपये पिक विमा नुकसानभरपाई वाटप आज पर्यंत शेतकऱ्यांना करण्यात आली.

तर विमा कंपन्यांना मात्र उद्धव ठाकरे सरकारच्या आशिर्वादाने ४२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असा आरोप करत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष अतुल गोळे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले, यावेळी आंदोलन कर्त्यानी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या गेल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डोक्याला विंचू चावल्यानं 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

न्यायालयाने जामिन नाकारलेल्या कैद्याला दिले सोडून