in

Hacking in US : अमेरिकेवर हॅकर्सचा हल्ला, कंपनी, रुग्णालयांचे कॅमेरे केले हॅक

जगात कोरोनाचे संकट पुन्हा तोंड वरती काढत असताना, अमेरिकेवर हॅकर्सने मोठा अटॅक केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सिलिकॉन व्हॅलीमध्ये असलेल्या स्टार्टअपचा सुरक्षा कॅमेऱ्याचा डेटा हॅक केला असल्याची घटना आता समोर आली आहे. या घटनेमुळे अमेरिकेत एकाच खळबळ उडाली आहे.

हॅकर्सनी रुग्णालये, कंपन्या, पोलीस विभाग, तुरुंग आर्मी शाळांमध्ये लावण्यात आलेले दीड लाखांहून अधिक सिक्युरीटी कॅमेऱ्याची लाइव्ह फिड मिळवले आहे. टेस्ला, क्लाउड फ्लेयर आदी कंपन्यांच्या डेटा हॅक करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.

हॅकर्सने महिला रुग्णातील आतील दृष्येही हॅक केली आहेत. यातील अनेक कॅमेरे हे चेहऱ्यावरून व्यक्तीची ओळख पटवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांचाही डेटा हॅकर्सच्या हाती लागला आहे. वेरकाडा कंपनीच्या सगळ्या ग्राहकांचे व्हिडिओ देखील हाती लागले असल्याचा दावा हॅकर्सने केला आहे. टेस्लाच्या व्हिडिओत शांघाईतील एक कर्मचारी असेंब्ली लाइनवर काम करत असल्याचे दिसत होते.

तज्ञाच्या मते हा हॅकर्स हल्ला आंतरराष्ट्रीय स्थरावरील असून, तुम्ही कितीही सिक्योरिटी कैमरे लावलेत तरी ते तोडणे सोपे आहे, ही गोष्ट हॅकर्सना जगाला दाखवायची आहे.

टेस्ला (Tesla) च्या कॅमेरामध्ये काय दिसले ?
हॅक झालेल्या व्हिडिओ ब्लूमबर्ग या वेबसाईटच्या हाती लागली आहे. या व्हिडिओमध्ये मिळालेल्या माहितीनुसार वेरकाडा कंपनीचा एक कॅमेरा हैलिफैक्स हेल्थ रुग्णालयामध्ये सुद्धा लावलेला आहे. या व्हिडिओमध्ये आठ कर्मचारी एका व्यक्तीस सांभाळताना दिसत आहेत. तर दुसरा व्हिडिओ टेस्ला कंपनीमधील शांघाईतील स्थित कंपनीमधील आहे. या व्हिडिओ कर्मचारी एका रांगेत उभे राहल्याचे दिसत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भागात लॉकडाऊनचे संकेत; दोन दिवसात निर्णय

MPSC Exam Postponed : MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, विद्यार्थी आक्रमक