लोकशाही न्यूज नेटवर्क
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. कालच ते वडोदरा येथील एका कार्यक्रमात चक्कर येऊन पडले होते. त्यानंतर त्यांच्या केलेल्या तपासण्यांमध्ये त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी सायंकाळी वडोदरा येथील नझीमपुरा परिसरात एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषण करत असतानाच त्यांना चक्कार आली आणि ते खाली कोसळले. रक्तदाब कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. तथापि, त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Comments
Loading…