in

पंतप्रधान मोदींच्या सख्ख्या पुतणीला गुजरात भाजपानं नाकारलं तिकीट

लोकशाही न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुतणी सोनल मोदी यांना अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने तिकीट नाकारलं आहे. “मोदींची पुतणी म्हणून नव्हे तर सामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून अहमदाबाद महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे”, असं सोनल मोदी अलिकडेच माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या.

एका वृत्तसंथ्येने दिलेल्या माहितीनुसार सोनल यांनी अहमदाबादच्या बोदकदेव वॉर्डातून भाजपाकडे तिकीट मागितलं होतं. मात्र निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली, त्यात सोनल मोदी यांचं नाव कोणत्याही वॉर्डातून घोषित केलं गेलेलं नाही.

या आठवड्याच्या सुरूवातीलाच गुजरात भाजपाने पक्षातील नेत्यांच्या नातलगांना तिकीट द्यायचं नाही असा निर्णय घेतला होता. याबाबत भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना विचारलं असता, सर्वांसाठी नियम सारखेच आहेत असं ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपाचे महावितरण विरोधात ताला ठोको, हल्ला बोल आंदोलन

साष्ट पिंपळगावमधील मराठा आंदोलनाचा 17 वा दिवस