in

वसंतदादा साखर कारखान्यात जीएसटी घोटाळा

जीएसटीचे १२ कोटी बुडवल्याप्रकरणात वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि कॉंग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासह १६ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंतदादा साखर कारखान्यातील विक्री केल्ल्या मालावर व्यापाऱ्याकडून जीएसटी घेऊन १२ कोटी ४४ लाखाची रक्कम राज्य जीएसटी कार्यालयात न भरल्यानेच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीतील संजय नगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल पाटील यांनी जीएसटीचे १२ कोटी रूपल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. जीएसटी कार्यालयाकडूनच ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी आता गुन्ह्याची नोंद झाली आहे.

संपुर्ण राज्यातील सहकारी संस्थांमध्ये वसंतदादा साखर कारखाना हा मोठा कारखाना आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध कारखाना म्हणून वसंतदादा साखर कारखान्याची ओळख आहे. या कारखान्याच्या कामगिरीत झालेल्या व्यवहारांमध्ये जीएसटीची रक्कम भरण्यात आलेली नव्हती. त्यामुळेच रक्कम थकवल्याप्रकरणी जीएसटी उपायुक्तांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारखान्याविरोधात झालेल्या कारवाईमुळे सांगली तसेच सहकार क्षेत्रातच एकुणच खळबळ माजली आहे. एकंदरीतच ही कारवाई म्हणजे सांगलीतील कॉंग्रेसला मोठा दणका बसल्याचे बोलले जात आहे.

जीएसटीच्या उपायुक्त असलेल्या शर्मिला विनय मिस्कील यांनी या प्रकरणात जीएसटी थकवल्यासाठीची तक्रार दाखल केली होती. त्यामुळेच संजय नगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्ह्याची नोंद केली आहे. कॉंग्रेसचे नेते आणि वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी जीएसटीचे १२ कोटी रूपय़े थकवल्याप्रकरणी त्यांच्यासह आणखी १६ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Budget Session | आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस

सचिन वाझेंना क्राईम ब्रांचमधून काढणार, गृहमंत्री यांची घोषणा; अटकेच्या मागणीवर विरोधक ठाम