भाजपा सरकारने 2016मध्ये सारासार विचार न करता नोटाबंदी केली. त्यामुळे देशात बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला असून असंघटित क्षेत्राची वाताहत झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाढीची घसरत्या जीडीपीशी तुलना केली आहे.
शशी थरूर यांनी एक ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घसरत्या जीडीपीवरून जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे दाढी असलेले पाच फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या वाढत्या दाढीची तुलना घसरत्या जीडीपीशी केली. मोदी यांची जसजशी दाढी वाढत गेली तस-तशी जीडीपीमध्ये घसरण झाल्याचे ग्राफिक्सच थरूर यांनी मांडले आहे.
यालाच ग्राफिक्स इलस्ट्रेशनचा अर्थ म्हणतात, असे कॅप्शन असलेल्या या ट्विटमध्ये 2017-18मधील चौथ्या तिमाहीची आकडेवारी दिली आहे. त्यावेळी जीडीपी 8.1 टक्के होता. तर, 2019-20च्या दुसऱ्या तिमाहीत तो 4.5 टक्क्यांवर आला असल्याचे ग्राफिक्स शशी थरूर यांनी या ट्विटरवरून दिले आहे.
Comments
Loading…