in

न्यूयॉर्कच्या Times Square वर होणार रामलल्लाचा जयघोष

Share

अमेरिकेत वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांसाठी मोठी बातमी आहे. देशात 5 ऑगस्टला श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरु असताना न्यूयॉर्कच्या Times Square वर भगवान रामाचा भव्य फोटो प्रदर्शित केला जाणार आहे.त्यामुळे जसा भूमिपूजनाचा उत्साह भारतात असणार आहे तसाच उत्साह Times Square वर हि पाहायला मिळणार आहे.

देशभरात येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत श्री राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे देशवासियांमध्ये उत्साह संचारला आहे. असाच सोहळा आता अमेरिकेत असलेल्या भारतीयांनाही साजरा करता येणार आहे. अमेरिकेत 5 ऑगस्टला राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा भव्यदिव्य रीतीने साजरा होणार आहे. न्यूयॉर्कमधील आयकॉनिक अशा टाइम्स स्क्वेअर वर भगवान रामाचा भव्य फोटो प्रदर्शित केला जाणार आहे. यासह टाइम्स स्क्वेअरवर राममंदिराचे थ्रीडी चित्रही दाखविण्यात येणार आहे.

प्रख्यात समुदाय नेते आणि अमेरिकन इंडिया पब्लिक अफेयर्स कमिटीचे अध्यक्ष जगदीश सेवानी यांनी सांगितले की, 5 ऑगस्ट रोजी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी करतील, तेव्हा न्यूयॉर्कमध्ये हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याची व्यवस्था केली जात आहे. जगदीश सेवानी यांनी पीटीआयला सांगितले की, या प्रसंगी भाड्याने घेण्यात आलेल्या मोठ्या होर्डिंग्जमध्ये अतिविशाल Nasdaq Screen आणि 17, 000 चौरस फूट Wrap-Around एलईडी डिस्प्ले स्क्रीनचा समावेश आहे. ही 17,000 चौरस फूट Wrap-Around एलईडी स्क्रीन टाइम्स स्क्वेअरमधील सर्वात उच्च रिझोल्यूशन एलईडी स्क्रीन असल्याचे मानले जाते. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हिंदी आणि इंग्लिशमध्ये ‘जय श्री राम’, भगवान रामाचे फोटो आणि व्हिडिओ, मंदिराची रचना आणि वास्तुकलेचा 3 डी फोटो यासह पंतप्रधानांनी पायाभरणी केलेल्या शिलान्यासचे फोटो टाइम्स स्क्वेअरवर प्रदर्शित होतील.

जगदीश सेवानी यांनी पुढे सांगितले की, ‘भारतीय समितीचे लोकही 5 ऑगस्टला टाईम्स स्क्वेअरवर हजर राहतील आणि या आनंददायी प्रसंगी मिठाई वाटप करतील. हा प्रसंग मानवजातीमध्ये एकदाच येत असल्याने तो मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.’

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

ONGC मध्ये मेगा भरती

कणकवलीत मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कोसळला