in

पानटपरी चालवून आजीनं नातवाला बनवलं सीए

लोकशाही न्यूज नेटवर्क

बुलढाण्यात राहत असलेल्या अंजनीबाई हांडके या आजीनं पंढरपुरात पानटपरी चालवून चिकाटीच्या जोरावर आपल्या नातवाला सीए बनविले आहे. सीए परीक्षेचा मंगळवारी निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये पंढरपूर तालुक्यातून या आजीचा नातू ऋषिकेश हांडके हा एकमेव उत्तीर्ण विद्यार्थी म्हणून पुढे आला आहे.
याच्या यशाचं पंढरपूर तालुक्यातून कौतुक केल जात आहे.

अंजनीबाई हांडके या मूळच्या दादुलगाव येथील रहिवासी आहेत .३० वर्षांपूर्वी पतीचं घरच्यांसोबत भांडण झाले. त्यामुळे पती रूसून पंढरपूरला निघून आले. त्यांच्या पाठोपाठ अंजनीबाईंनीही पंढरपूर गाठलं. पंढरपुरातच गवंड्याच्या हाताखाली काम, उदरनिर्वाह सुरू केला. त्यांच्या पतीनं २० वर्षांपूर्वी पंढरपूर-स्टेशन रोड परिसरात पानटपरी सुरू केली. मात्र, अवघ्या काही दिवसांनंतर पतीचं निधन झालं तेव्हापासून पानटपरीचा ताबा त्यांनी स्वत:च्या हाती घेतला. या आजीने तिन्ही नातवांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत ऋषिकेश हांडके याला सीए केले. लहानपणापासूनच हुशार. मात्र, परिस्थिती नसल्याने त्याला आम्ही फारसे देऊ शकलो नाही असं अंजनीबाईनं सांगितले.

दहावीपर्यंतचे शिक्षण हलाखीत गेले. ११वी, १२वी चे शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले. त्यावेळी तो १२ वी वाणिज्य शाखेतून महाविद्यालयात प्रथम आला. त्याचवेळी त्याने पुण्याला शिक्षणाला जायची कल्पना आजी व वडिलांकडे बोलून दाखविली. त्यावेळी आजी व वडिलांनी परिस्थिती नसतानाही त्याला पुण्याला जाण्यासाठी परवानगी दिली. आजीने पानटपरी चालवून स्वत:चा प्रपंच चालवून त्या तिन्ही भावंडांसाठी पुण्याला प्रत्येक महिना २० हजार रुपयांचा खर्च चालू ठेवल्याचे ऋषिकेशने सांगितले.


तब्बल पाच वर्षे आजी व वडिलांनी घेतलेलं कष्ट समोर ठेवून अभ्यास केला आणि सीएच्या परीक्षेत उत्तीर्ण झालाे. आता यापुढे दोन्ही भावंडांच्या शिक्षणासाठी आजी व वडिलांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ऋषिकेशने सांगितलं भविष्यात आपल्याला शासकीय लेखापरीक्षक किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर आयुक्त होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Farmers Protest : आता लता मंगेशकर अन् विराट कोहलीनं केलं सरकारच्या बाजूने ट्विट

शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी उकळते; हा घ्या पुरावा…