in ,

ॲप ‘आरोग्य सेतू’मधील त्रुटी शोधा; चार लाखांचे बक्षीस मिळवा

Share

नवी दिल्ली: देशात वाढणारे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या ट्रेसिंग ॲप आरोग्य सेतूमधील त्रुटी शोधून कळविल्यास सुमारे चार लाखांचे बक्षीस देण्यात येईल, आवाहन केंद्र सरकारने केले आहे. हा कार्यक्रम 26 जूनपर्यंत चालणार असून, ॲपची सुरक्षा सुधारणे, त्याला प्रोत्साहन देणे असे उदिष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकारने 2 एप्रिल रोजी आरोग्य सेतू उपलब्ध करून दिल्याने ॲपच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षांनीही त्यांच्या अंमलबजावणीवर टीका केली. ॲपच्या माध्यमातून भारतीयांचा डेटा लीक करण्याची धमकीही एका हॅकरने दिली होती. त्यानंतर सरकारने ॲपचा ओपन सोर्स बनवला असून, आरोग्य सेतूसाठी बग बाउंटी प्रोग्रामची घोषणा देखील केली आहे. यानुसार ॲपमधील असुरक्षितता निदर्शनास आणून देणार्‍यास चार लाख रुपयांची बक्षीस दिले जाणार आहे.

बग बाऊंटी कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, ॲपमध्ये कोणतीही त्रुटी आढळून आल्यास सिक्युरिटी व्हेनेरबिलिटी रिपोर्ट या अंतर्गत bugbountynic.in वर ई-मेल करावेत. याशिवाय कोड सुधारणेबाबत सूचना असल्यास ई-मेल पाठविण्याचेही आवाहन केले आहे. अन्य एका माहितीनुसार, ज्या संशोधकांना ॲपमधील एखादी त्रुटी सापडल्यास तिचे निराकरण होण्यापूर्वी जाहीरपणे उघड करण्याची परवानगी नाही. तसेच, बग बाऊंटी प्रोग्राममध्ये आरोग्य सेतू टीम, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय (मीटीवाय) मधील कर्मचार्‍यांना सहभागी होण्यास मनाई आहे.

ॲपमध्ये असुरक्षितता आढळल्यास एक लाख रुपये मिळतील. त्याचसोबत कोड सुधारणा त्यासाठी एक लाख अशाप्रकारे चार लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान, फ्रान्समधील हॅकर रॉबर्ट बाप्टिस याने आरोग्य सेतू ॲपवरून भारतीयांची माहिती उघड होण्याचा दावा केला होता. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असताना सदर ॲप खाजगी संरक्षण, सुरक्षा आणि डेटा सुरक्षिततेच्या बाबतीत पूर्णपणे मजबूत असल्याचा दावा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला होता.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

आयुष्याला ‘रिस्टार्ट’ करणारा कोरोना लॉकडाऊन!

लॉकडाऊन काळात व्यसन सोडायचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय!