in

चाकरमान्यांची कोंडी करण्याचा सरकारचा प्लॅन-आशिष शेलार

Share

कोरोनाच्या महामारीमुळे यंदा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 7 ऑगस्टपूर्वीच आपलं गाव गाठावं लागणार आहे. या संबंधित निर्णय कालच सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत पार पडला. मात्र अंतिम निर्णय हा राज्य सरकारचा असून तसा प्रस्ताप पाठवण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर आता भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

यंदा कोरोनामुळे गणेशोत्सवात चाकरमान्याना कोकणात जाताही येते कि नाही याची शक्यता कमी होती. मात्र गुरुवारी परजिल्ह्यांतून येणाऱ्या गणेशभक्तांना 7 ऑगस्टपर्यंतच सिंधुदुर्गात प्रवेश देण्याची भूमिका जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली होती. 7 ऑगस्टपर्यंत सिंधुदुर्गात आल्यानंतर विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्याबरोबरच ई-पास नसलेल्या वाहनांना प्रवेश नाकारण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मात्र, हा निर्णय अंतिम नाही. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शांतता समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावरून भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “लालबागच्या राजाची आणि भक्तांची ताटातूट करु नका. तसंच कोकणातील चाकरमान्यांची आणि बाप्पाची भेट कशी होणार? याची आम्ही सरकारकडे विचारणा केली होती. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना पुढे करुन चाकरमान्यांची कोंडी करण्याचा प्लॅन तयार केला आहे का? परस्पर घोषणा केली का? सरकारला हे मान्य आहे का?,” असे सवाल त्यांनी केले आहेत. त्यांनी ट्विटरवरून सरकारला याबाबत प्रश्न केले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘हा’ जगप्रसिद्ध मिमर आहे नायजेरियाचा अभिनेता!

एक शरद आणि शिवसेना गारद -नारायण राणे