in

ग्राहकांना हव्या त्या किंमतीत सिलेंडर? पुण्यात प्रयोगिक तत्वावर सुरुवात!

नागरिकांना सुरळीत आमि सुलभतेने चांगली सेवा मिळण्यासाठी केंद्र सरकार पुण्यात घरगुती सिलेंडर संदर्भात नवा निर्णय येण्याची शक्यता आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडू LPG गॅस सिलेंडर घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न केले जात असून सुरुवातीला प्रायोगित तत्वावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या सुविधेची चाचपणी केली जाणार असून त्यामध्ये पुण्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच आपल्याला हव्या त्या वितरकाकडून LPG गॅस सिलेंडर भरून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पीक कर्ज मिळेना; शेतकऱ्यांनी मागितली मुख्यमंत्र्यांकडे किडनी विकण्याची परवानगी

Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांना दिलासा… कॅबिनेटचे ६ मोठे निर्णय