in

देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ला सरकारकडून क्लीन चिट

भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे सुरुवातीपासूनच तांत्रिक दुरुस्त्या नापास झालेले अभियान असल्याची टीका झाली होती. त्याचबरोबर जलयुक्त शिवारच्या कामातील गैरव्यवहारावर काही चौकशी समित्या स्थापन झाल्या होत्या. ‘जलयुक्त’ला आता महाविकास आघाडी सरकारकडूनच क्लीन चिट मिळाली आहे. याबाबत जलसंधारण विभागाचा अहवाल समोर आला आहे. पीक पेरणी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानाच्या दर्जात जलयुक्त शिवार अभियानामुळे सुधारणा झाल्याचे या अहवालामध्ये म्हटले आहे.

जलसंधारण विभागाच्या अहवालात शेतकऱ्यांचे उत्पन्न या योजनेमुळे वाढल्याचे म्हटले आहे. 1,76,284 पैकी 58 हजार जलयुक्तच्या कामांचे मूल्यमापन केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मंत्र्यांनी केली होती. जलयुक्त शिवार योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रीम योजना होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवाब मलिकांनी केला समीर वानखेडेंचा आणखी एक फोटो शेअर, म्हणाले…

‘या’ जिल्ह्यांत अजुनही होतात बालविवाह…