in

राज्यपाल आणि सरकारमध्ये सुरूच आहे, ‘पत्रास कारण की…’

विधानसभेचं अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. या पदासाठी निवडणूक कधी घेणार, असा सवाल उपस्थित करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला लिहिलं आहे. नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे.

आगामी काही दिवसात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनापूर्वीच विधानसभेचा अध्यक्ष नियुक्त करावा, असं या पत्रात म्हटलं आहे. राज्य सरकार आणि राज्यपालांमधील वाद हा सर्वश्रुत आहे. आता याप्रकरणावरून तो वाद आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.

मंदिरं खुली करण्यापासून पत्रव्यवहाराला सुरुवात –

राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात अनेकदा पत्रव्यवहार झाला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस राज्यातील धार्मिक स्थळे बंद होती. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना उद्धव ठाकरे सरकारला पत्र लिहून, राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी करणारे पत्र लिहिले होते. यानंतर पुन्हा एकदा पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. यानंतर याला प्रत्युत्तर देताना, शिवसेनेला हिंदुत्वाची आठवण तुम्ही करून देण्याची गरज नाही, असे म्हटलं होतं. दरम्यान, राज्यपाल नियुक्त १२ जागांचा प्रस्ताव राज्य सरकारनं राज्यपालांकडे पाठवला होता. मात्र, राज्यपालांनी अद्यापही त्यावर निर्णय घेतलेला नाही. यानंतर आता पुन्हा एकदा राज्यपालांनी पत्रप्रपंच करत महाविकास आघाडी सरकारला विधानसभा अध्यक्ष नियुक्तीबाबत प्रश्न केले आहेत. राज्यपालांच्या या पत्राला राज्य सरकार काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महाविकास आघाडी सरकारनं राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी पाठवलेली आहे. मात्र, अनेक दिवस उलटूनही अद्याप राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. राज्यपाल वारंवार घटनात्मक पदाचा अपमान करत असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील ‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन?

राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस, शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान