in

Pandharpur Bypolls; ‘अजित पवारांचं बोलणं टग्याचं आणि रडणं बाईचं’; गोपीचंद पडळकरांचा पलटवार

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असून राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आले आहे. आज प्रचारसभेनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘अजित पवारांचं बोलणं टग्याचं आणि रडणं बाईचं’ अशी खरमरीत टीका केली.

उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार पडळकर यांच्यावर डीपॉझिट जप्त झालेले लोक पंढरपूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराला येत असल्याची टीका केली होती. या टीकेचा समाचार आमदार पडळकर यांनी घेतला आहे. उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे बोलणे टग्या सारखे असून रडणे बाई प्रमाणे असल्याची टीका केली. तसेच चुलता हेच भांडवल असून आपल कर्तृत्व शून्य असल्याचे अजित पवार यांनी मान्य केले पाहिजे असा सल्ला ही पडळकर यांनी दिला. या करणामुळेच पंढरपुरात दारोदार फिरून चहा पोहे खायची वेळ आली असल्याचा टोला ही त्यांनी पवारांना लगावला.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबाजोगाई येथील रुद्रवार दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यूप्रकरणी सुप्रिया सुळें आक्रमक

कलिंगडाच्या शेतीतून संगमनेरचा युवा शेतकरी बनला ‘लखपती’