in

MPSC Exam Postponed; गोपीचंद पडळकर, राम सातपुतेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि भाजप आमदार राम सातपुते यांना आंदोलन स्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याचबरोबर पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना आंदोलन स्थळावरून हटवण्यासाठी रस्त्याच्या लाईट सुद्धा बंद करण्यात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, राम सातपुते हि सहभागी झालेले बघायला मिळाले. या सर्व गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीची परीक्षा पुढच्या आठवड्यात होईल आणि त्याचं वेळापत्रक उद्या जाहीर होईल, असं स्पष्ट केलं. त्यामुळे पुण्यात सुरु असलेलं आंदोलन विद्यार्थी मागे घेतील का ? असा प्रश्न होता.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर गोपीचंद पडळकर यांनी मी आता विद्यार्थ्यांसोबत आहे. विद्यार्थी म्हणाले इथेच थांबायचं तर इथेच थांबणार आहे. विद्यार्थ्यांची जी भूमिका असेल ती आमची असेल. येत्या 14 तारखेला परीक्षा व्हावी हाच आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका जाहीर केली आहे ती विद्यार्थ्यांच्या हिताची नाही असेही त्यांनी म्हटले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MPSC Exam Postponed; आम्ही इथेच झोपणार- गोपीचंद पडळकर

कोरोनाचा हाहाकार! नवीन कोरोना रुग्णसंख्येचा आकडा 14 हजार 317