in

नागपूरमध्ये नागरिकांनी केली गुंडाची हत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क

नागपूर हत्येच्या घटनेनं हादरलं आहे. नागपूरमध्ये नागरिकांनीच गुंडीची हत्या केली आहे. काल रात्री च्या सुमारास शांतीनगर मधील नारायण पेठ येथे ही हत्येची घटना घडली आहे. विजय वागधरे असे मृतक गुंडाचे नाव आहे.. मृतक विजय चे काल दुपार पासून सुनील नावाच्या व्यक्ती सोबत भांडण सुरू होते याची तक्रार देण्यासाठी सुनील पोलीस स्टेशन ला गेला, मात्र उपमुख्यमंत्री या परिसरात येणार असल्याने पोलीस बंदोबस्त तिकडे असल्याने पोलिसांनी विजय चा शोध घेतला नाही.

रात्री च्या सुमारास मृतक विजय ने सुनील च्या घरासमोर येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली.. गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त नागरिकांनी दगडाने ठेचून गुंडाची हत्या केली आहे. विजय हा त्याच्या साथीदारा सोबत हप्ता वसुली करायचा. त्याच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. याच परिसरात काल उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री प्रफुल्ल पटेल आणि इतर नेते यांचा कार्यक्रम होता. पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतले असून बाकी आरोपींचा शोध घेणे सुरू आहे . विजयची हत्या ही अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती असल्याचे बोलले जाते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तराखंड महाप्रलय: बचावकार्यात 15 जणांना वाचविण्यात आले यश

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकल्याने पंतप्रधानांचा विरोधकांना टोला