in

Google ची फिरकी; म्हणतंय अनुष्का शर्मा राशिद खानची पत्नी

Share

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान याने आपल्या फिरकीच्या जोरावर चांगलेच नाव कमावले आहे. मात्र आता तो त्याच्या मैदानावरील कामगिरीमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणाने चांगलाच चर्चेत आला आहे.


बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा ही टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी आहे. मात्र गुगलवर राशिद याच्या पत्नीबाबत सर्च केल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचे नाव येत आहे.
सध्या अनुष्का यूएईमध्ये खेळाचा आनंद लुटताना दिसत आहे. मात्र या गुगल प्रकरणामुळे ती जास्तच चर्चेत आली आहे.


तज्ज्ञ सांगतात की, 2018 ला राशिद खान आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत गप्पा मारत असताना एकाने त्याला त्याच्या आवडत्या बॉलिवूड अभिनेत्री बाबत विचारले. तेव्हा त्याने सांगितले की अनुष्का शर्मा आणि प्रीती झिंटा. तेव्हापासून गुगलवर राशिदच्या नावासोबत अनुष्काचे नाव जोडले गेले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

…आता फक्त एलियन दिसायचे राहिलेत; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

अभिनेत्री कंगना रणौतने उडवली खासदार संजय राऊतांची खिल्ली, पाहा ट्विट