in

खुशखबर! दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात…

Share

मान्सूनने दक्षिण-मध्य कर्नाटकचा काही भाग व्यापला असून बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार झाले आहे. दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने दिले आहेत.

हवामान विभागाचा अंदाज : नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरू असून मान्सूनने आता दक्षिण-मध्य कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या प्रवासाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

राज्यात चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली.

तापमान : राज्याच्या विविध भागात कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली. राज्यातील उच्चांकी तापमान 41.5 अंश सेल्सिअस चंद्रपूर येथे आणि नीचांकी तापमान 17.5 अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले.

पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राष्ट्रवादीच्या ‘या’ नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

KDMC मध्ये मोठी भरती