in

मोबाईल वॉलेट युजर्ससाठी खुशखबर, RBI ने बदलले पैसे ट्रान्सफरचे नियम

सध्या अशा मोबाईल वॉलेट ऑपरेटर्सची संख्या खूप कमी आहे . आता ही सेवा अजूनच सुलभ होणार आहे. मोबाइल वॉलेटमधून दुसर्‍या मोबाइल वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरीत करण्यासाठी दुसरा व्यक्ती कोणती सेवा वापरत आहे हे पाहण्याची आवश्यकता नाही. भारतीय पतधोरण बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने यासाठी विशेष घोषणा केली आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने म्हटले आहे की, केवायसी आवश्यकता पूर्ण झाल्यास मोबाइल वॉलेट्स इंटरऑपरेबिलिटी सुलभ करू शकतात.

सध्या मोबाइल वॉलेटमधून पैसे हस्तांतरीत करण्यासाठी युपीआयचा वापर देखील केला जातो. हे वॉलेट-टू-बँक, बँक-टू-वॉलेट किंवा बँक-टू-बँक हस्तांतरण म्हणून कार्य करते. परंतु, आरबीआयच्या नवीन घोषणेनंतर आपण कोणत्याही वॉलेटमधून दुसर्‍या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरीत करू शकता. उदाहरणार्थ समजले तर आपण पेटीएम मोबाइल वॉलेटमधून फोनपे वॉलेट वापरकर्त्याकडे पैसे हस्तांतरित करू शकता.

प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्समधील मनी लॉन्ड्रिंगविरोधी नियमांचे पालन वाढवण्यासाठी आरबीआयने काही खास घोषणादेखील केल्या आहेत. केंद्रीय बँकेने केवायसीची आवश्यकता पूर्ण करणार्‍या खात्यांसाठी थकबाकीची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढविली आहे .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बाळासाहेबांची शपथ घेतो…हे विरोधकांचे षडयंत्र, शिवसेनेकडून चेंडू भाजपच्या गोटात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून साधला विद्यार्थ्यांशी संवाद