in

सुवर्णसंधी ! सोने-चांदी पुन्हा एकदा झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Share

सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली, परंतु मंगळवारी त्यात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सकाळी 10 वाजता ऑक्टोबरच्या सोन्याच्या वायदा भावात 203 रुपयांनी घसरण होऊन ते 50862 रुपयांवर आले होते. मागील सत्रात सोने 51065 रुपयांवर बंद झाले आणि आज सकाळी 50800 रुपयांवर खुले झाले.

मागील सत्रात ते 51244 रुपयांवर बंद झाले होते आणि आज सकाळी 51023 रुपयांवर ते उघडले. डिसेंबरच्या डिलीव्हरीसाठी चांदी 382 रुपयांनी घसरून 67889 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. मागील सत्रात चांदी 68271 रुपयांवर बंद झाली आणि आज सकाळी 67799 रुपयांवर खुली झाली.

एका महिन्यात सोने 5500 रुपयांनी स्वस्त झाले

गेल्या महिन्यात 7 ऑगस्टला सोन्याने फ्युचर्स मार्केटमधील उच्चांकाची पातळी गाठली आणि दर दहा ग्रॅमची किंमत वाढून 56,200 रुपये झाली. त्यानंतर महिन्याभरात सोन्याच्या किमती सुमारे 5500 रुपयांनी खाली आल्या. म्हणजेच एका महिन्यात सोन्याची किंमत दहा टक्क्यांनी घसरली. म्हणजेच सोन्याच्या किमतींमध्ये एवढी घसरण झाली आहे की ही सोन्याची खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर हल्लाबोल

रिया चक्रवर्तीला अखेर अटक