in

सोन्याच्या व्यवसायास सोनेरी दिवस

लॉक डाऊन काळात दीड ते दोन वर्ष दुकाने बंद असल्याने सोन्याच्या व्यवसायास मोठा फटका बसला होता. कोरोना महामारीमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झाल्याने सराफा बाजार बंद असूनही देखील सोन्याचे भाव तब्बल ५८ हजार पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे राज्यातील सराफा बाजारात मोठी मंदी होती. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने व सोन्याचा भावातही घसरण झाल्याने यंदाचा दसरा दिवाळी गुरुपुष्यामृत हे सोन्याच्या व्यावसायिकांसाठी सोनेरी ठरले असून राज्यात सणासुदीला पाचशे किलो सोन्याची विक्री झाली आहे. तर अजूनही प्रति दिवशी राज्यात शंभर ते दोनशे किलो सोने विक्री होत आहे. त्यामुळे सराफा व्यावसायिकांचे गेल्या दोन वर्षाचे नुकसान अवघ्या दोन महिन्यात भरून निघाले आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे झालेल्या लॉक डाऊनने सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. त्यातच लॉकडाऊन काळात जागतिक बाजारपेठेतही मोठी चढ उतार पाहायला मिळाली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला अग्रक्रम दिला जातो, त्यामुळे कोरोना जागतिक महामारीमुळे जागतिक स्तरावर सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाल्याने सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होऊन लॉकडाउन काळात सोन्याचे भाव 58 ते 60 हजार रुपये पर्यंत पोहोचले. त्यामुळे महाराष्ट्रात लॉक डाऊन व भाव वाढ याचा परिणाम सोन्याच्या व्यवसायावर होवून जळगाव सुवर्ण नगरी सह राज्यातील सर्व सोने व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. मात्र यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्याने व नियमांमध्ये शिथिलता झाल्याने व त्या सोबतच सोन्याच्या भावात झालेली घसरणीमुळे सुवर्ण नगरीत ला सोनेरी दिवस आले असून मोठ्या प्रमाणात सोन्याची ग्राहक खरेदी करत असल्याने सोन्याच्या व्यवसायाला सोनेरी दिवस आले आहेत.

दसरा-दिवाळी गुरुपुष्यामृत या योगाच्या पार्श्‍वभूमीवर प्रति दिवशी तब्बल 500 किलो सोन्याची विक्री झाली तर दिवाळीनंतरही प्रति दिवशी 100 ते 200 किलो सोन्याची विक्री राज्यात होत आहे. त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून सोन्याच्या व्यवसायाला जो फटका बसला होता तो अवघ्या दोन महिन्यात भरून निघाला आहे. त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीसह राज्यभरातील सोन्याच्या व्यापाराला सोनेरी दिवस आले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘पांडू’ चित्रपटामध्ये प्रविण तरडे साकारतायेत महत्त्वपूर्ण भूमिका

पुण्यातील ग्रामीण भागात पुढील 7 दिवस जमावबंदीचे आदेश लागू