in

Gold Silver Rate Today | सोनेचांदी खरेदीचा आज शुभमुहूर्त?

ऑक्टोबर महिन्यात सोन्याचांदीच्या दरात झालेल्या चढउतारात चढंच जास्त होते. परंतु आज सोनेचांदी खरेदी करण्यासाठी चांगला मुहूर्त आहे.

आज सोनेचांदी खरेदी करण्यासाठी चांगला मुहुर्त आहे कारण आज सोने आणि चांदी, दोघांचे दर उतरले आहेत. आज 10 ग्रॅम सोने 48 हजार 300रू. आहे तर चांदीचे दर प्रति किलो 66 हजार 500रू. आहे. सोन्याचा दरात 400रुपयांती घसरण आहे तर चांदीच्या दरात चांगले 1 हजार 100रुपयांची घसरण आहे.

तर आता सोन्याचांदीचे दर माहित करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. काही वेळात या मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. तसेच आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol-Diesel Rate Today | किती वाढले आहेत आज इंधन दर?

नवाब मलिकांनी केला समीर वानखेडेंचा आणखी एक फोटो शेअर, म्हणाले…